Ind-Pak Live Score : आयसीसी विश्वचषक 2023 च्या 2023 व्या सामन्यात टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध एकही सामना गमावलेला नाही. अशापरिस्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर हा विक्रम कायम ठेवायचा आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात वर्ल्ड कप 2023 चा 2023 वा सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणकरण्याचा निर्णय घेतला.
भारतीय संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये एकच बदल केला आहे. भारतीय संघाने इशान किशनच्या जागी शुभमन गिलचा समावेश केला आहे. पाकिस्तानने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध एकही सामना गमावलेला नाही. अशापरिस्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर हा विक्रम कायम ठेवायचा आहे.
भारताने आतापर्यंत स्पर्धेत खेळलेल्या दोन्ही सामन्यात विजयाची चव चाखली आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर रोहितच्या संघाने अफगाणिस्तानला सहज पराभूत केले. श्रीलंकेविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात पाकिस्तानने ३४५ धावांच्या विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करत विजयाची चव चाखली.
भारत विरुद्ध पाक प्लेइंग ११
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह.
पाकिस्तान : इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हारिस रऊफ.