नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी, महायुती आणि देशातील सर्वच प्रमुख पक्ष आणि नेते कंबर कसून तयारी करत आहेत. अशातच स्वतः पंतप्रधान मोदी यांनी अबकी बार 400 पार असा नारा दिला आणि या घोषणेसोबतच ईव्हीएम घोटाळ्याबाबत देखील पुन्हा एकदा सवाल उपस्थित केले जात आहेत.
भाजपने आपकी बार 40 पार असा नारा दिला. यावर विरोधक ईव्हीएम घोटाळ्यावरून सवाल उपस्थित करत आहेत. तर भाजप उमेदवार निवडून येतो तिथेच घोळ होतो का ? जिथे काँग्रेसचे सरकार येते तिथे इव्हीएम बरोबर असतं का ? असा सवाल देखील भाजपच्या वतीने उपस्थित केला जातो. यावरच एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यावर आज न्यायालयाने निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
CM Eknath Shinde : ” बारामतीत परिवर्तन होणार ! आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे..! ” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बारामतीकरांना आवाहन
या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली. यावेळी न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दिपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने नक्की काय घडलंय याची चौकशी करा असे निर्देश निवडणूक आयोगाला दिले असून ईव्हीएमच्या घोटाळ्यावरून न्यायालय देखील गंभीर असल्याचं आयोगाला सुनावल आहे. तसेच हे आरोप गंभीरतेने घेण्याचे देखील निर्देश दिले आहेत.