सिक्किम : सिक्कीममध्ये अचानक ढगफुटी झाली आहे. सिक्कीममधील तिस्ता नदीमध्ये तुफान पूर आल्यामुळे जनजीवन प्रचंड विस्कळीत झाले आहे. धक्कादायक म्हणजे येथे तैनात करण्यात आलेले 23 लष्करी जवान देखील बेपत्ता झाले आहेत.
सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन बचावकार्य सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
https://x.com/prodefgau/status/1709396653059551741?s=20
ढगफुटी झाल्यामुळे अचानक निसर्गाच्या कोपामुळे खोऱ्यातील काही लष्करी आस्थापना प्रभावित झाल्या असून 23 जवान बेपत्ता झाले आहेत. तर काही वाहने गाळाखाली देखील दबल्याची माहिती समोर येते आहे.
त्याच बरोबर चुंगथांग धरणातून पाणी सोडल्यामुळे पंधरा ते वीस फूट उंचीपर्यंत पाण्याची पातळी अचानक वाढली आहे. त्यामुळे हा पूर आला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.