वडोदरा : गुजरातमधील वडोदरा येथील एका फार्मास्युटिकल केमिकल Pharma Factory कंपनीच्या पाईपमध्ये गळती झाल्याची घटना मंगळवारी घडली. यामुळे बाधित झालेल्या चार कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी ही माहिती दिली.
सर्व कामगारांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती घटनेवर लक्ष ठेवणाऱ्या अधिकाऱ्याने दिली. गॅस गळतीची घटना आज सकाळी आठच्या सुमारास घडली आहे. घटनेच्या वेळी नांदेसरी जीआयडीसी परिसरात असलेल्या कारखान्याच्या आवारात अनेक कामगार उपस्थित होते.
कारखान्यात गॅस गळती कशी झाली?
घटनेच्या वेळी नांदेसरी जीआयडीसी परिसरात असलेल्या कारखान्याच्या आवारात अनेक कामगार उपस्थित होते. गॅसगळती झाली तेव्हा जॉइंटमधून खराब झालेला पाईप वेगळा करण्याचे काम सुरू होते. तेथे उपस्थित असलेल्या चार कामगारांनी गॅस गळतीची तक्रार केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.सुदवणे जीवित हानी टळली असून परिस्थिती नियंत्रणात आहे.