मुंबई : यंदाचा शिंदे गटाचा मेळावा हा आझाद मैदानावर घेण्यात येणार आहे. शिंदे गटाकडून क्रॉस मैदान आणि आझाद मैदान ही दोन मैदानं ठरवण्यात आली होती. पण हा मेळावा आता आझाद मैदानावर घेण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. क्राॅस मैदान यावरती क्रिकेटच्या मैदानांचे पिच आणि मैदानांवर नियोजन करण्यात अडचणी येत असल्याने आझाद मैदानवर शिंदे गटाचा दसरा मेळावा घेतला जाणार असून पोलिसांनी देखील या मैदानावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी शिंदे गटाला दिली आहे.
दसऱ्याच्या दिवशी घेण्यात येणाऱ्या मेळाव्यसाठी यंदा देखील ठाकरे आणि शिंदे गटामध्ये शिवाजी पार्क मैदानावरुन वाद निर्माण झाला होता. पण शिंदे गटाने माघार घेत हा मेळावा दुसऱ्या मैदानावर घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर क्रॉस मैदान आणि आझाद मैदान या दोन मैदांनांचा विचार करण्यात आला. त्यानंतर आझाद मैदानावर शिंदे गटाकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.










