तामिळनाडू : मिचौंग चक्रीवादळामुळे Cyclone Michong आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाल आहे. रस्ते खराब झाले आहेत, नद्या- कालवे आणि तलावांना पूर आला आहे. राज्यातील हजारो एकर पिके पाण्याखाली गेली आहेत. चक्रीवादळामुळे दोन्ही राज्यांमध्ये झालेल्या नुकसानीवरही केंद्र सरकार लक्ष ठेवून आहे. दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मिचौंग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीसाठी तातडीने 5060 कोटी रुपयांचा अंतरिम मदत निधी देण्याची मागणी केली आहे.
नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक पाठविण्याची मुख्यमंत्र्यांची विनंती
चक्रीवादळामुळे राज्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक पाठवण्याची विनंतीही त्यांनी पंतप्रधानांना केली. दिल्लीत द्रमुकचे खासदार टी. आर. बालू हे पत्र पंतप्रधान मोदींना सुपूर्द करतील.
चक्रीवादळामुळे 17 जणांचा मृत्यू
तामिळनाडूच्या चेन्नई आणि लगतच्या भागात सोमवारी चक्रीवादळामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १७ वर पोहोचली आहे. मंगळवारी चेन्नई आणि आजूबाजूच्या परिसरात पाण्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बोटी आणि ट्रॅक्टरचा वापर करण्यात आला.