छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजाच्या समन्वयकांच्या बैठकीमध्ये आज मोठा राडा झाला आहे. या बैठकीमध्ये आज दोन गटात तुफान मारामारी झाली आहे. बर या राड्यामध्ये फक्त पुरुषच नाही तर अगदी महिला देखील भिडले आहेत.
नेमकं काय घडलं
आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजाच्या समन्वयकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक मराठा समाजाचा एक उमेदवार लोकसभा निवडणुकीसाठी उभा करायचा या विषयासाठी आयोजित करण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगरमधील जळगाव रोड वरील मराठा मंदिर सभागृहात ही बैठक सुरू होती. या बैठकीसाठी मोठ्या प्रमाणावर मराठा आंदोलक उपस्थित होते. यामध्ये महिला आणि पुरुष या दोघांचाही मोठा सहभाग दिसून आला
दरम्यान या बैठकीमध्ये दोन गट एकमेकांना भिडले आहे. या बैठकीमध्ये उमेदवार नेमका कोण द्यायचा या विषयावरून वाद पेटला. यात विकी पाटील या आंदोलकाने व्यक्त होण्यास सुरुवात केली. यात उमेदवार नेमका कोण द्यावा यासाठी जी नाव सुचवण्यात आली होती, त्यापैकी काही नावांना या व्यक्तीने विरोध दर्शवला. तसेच आपल्याला उमेदवारी देण्यात यावी अशी थेट मागणी केली. तेव्हा हा वाद सुरू झाला. त्यानंतर बाळू औताडे या आंदोलने शिवीगाळ केल्याचा आरोप करून थेट मारहाणीला सुरुवात झाली.
Lok Sabha Elections 2024 : पुण्यात लोकसभेची रंगत वाढणार ! वसंत मोरे प्रकाश आंबेडकरांच्या भेटीसाठी दाखल
दरम्यान बैठक ज्या कारणासाठी घेण्यात आली त्या उमेदवाराचं नाव तर निश्चित होऊ शकलं नाही. परंतु महिला आणि पुरुषांच्या या मारहाणीमध्ये ही मराठा समाजाची बैठक चांगलीच गाजली आहे.