महाराष्ट्र : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज SSC Result एसएससी बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा देखील मुलींनीच बाजी मारली असून राज्याचा निकाल 95.81% लागला आहे.
मुलींनी यावर्षी देखील बाजी मारली असून कोकण विभागानं यंदाच्या दहावीच्या परीक्षेमध्ये सर्वात जास्त गुणवंत विद्यार्थी तयार केले आहेत. विशेष म्हणजे सर्वच विभागांमधून मुलींनी बाजी मारली आहे.
शैक्षणिक वर्ष 2023 ते 24 मध्ये दहावीच्या 16 लाख 9 हजार 544 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. दरम्यान सर्वच विभागातून निकालाची टक्केवारी जाहीर करण्यात आली आहे. तर आज दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे. बोर्डाच्या अधिकृत
https://mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://sscresult.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
https://results.targetpublications.org/ या वेबसाईटवर हा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये धाकधूक वाढली आहे.
विभागनिहाय निकाल (टक्केवारी)
पुणे : 96.44 टक्के
नागपूर : 94.73 टक्के
छत्रपती संभाजीनगर : 95.19 टक्के
मुंबई : 95.83 टक्के
कोल्हापूर : 97.45 टक्के
अमरावती : 95.58 टक्के
नाशिक : 95.28 टक्के
लातूर : 95.27 टक्के
कोकण : 99.01 टक्के