पुणे : पुण्यामध्ये Pune Breaking भाऊ रंगारी गणपतीजवळ असलेल्या एका दुमजली वाड्याला आज दोन वाजण्याच्या सुमारास भीषण आग Massive fire लागली. नेमकी आग कशामुळे लागली हे कारण अद्याप समजू शकल नाही.
आज मंगळवार दिनांक 16 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भाऊ रंगारी गणपती जवळ देवरुखकर वाडा, बुधवार पेठ या ठिकाणी दुमजली वाड्याला भीषण आग लागली होती. या वाड्यामध्ये ट्रॉफी बनवण्याचे सामान ठेवण्यात आलं होतं. नेमकी आग कशामुळे लागली हे समजू शकलं नाही. परंतु ट्रॉफी बनवण्याच्या साहित्याने पेट घेतला आणि मोठ्या प्रमाणावर धूर झाला होता.
आगीची वर्दी मिळताच फायर ब्रिगेडच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवळपास 10 अधिकारी 40 जवान यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग इतरत्र पसरू नये म्हणून प्रचंड मेहनत घेतली. या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी नाही. सध्या या ठिकाणी कूलिंगचे काम सुरू असल्याची माहिती पुणे फायर ब्रिगेडच्या वतीने देण्यात आली आहे.