तमिळनाडू : सध्याच्या घडीला ज्या पद्धतीचे राजकारण सुरू आहे त्यामुळे अगदी देशभरात अनेक नेत्यांची मनस्थिती प्रचंड खराब झाली आहे. अनेक जण यास राजकारणाचा भाग म्हणून पुढे सरकतात. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमधून राजकीय डावपेच खेळले जात आहेत. पण या राजकारणाच्या डावपेचामध्ये आज एका खासदाराने आपले प्राण गमावले आहेत.
आज पहाटेच्या सुमारास तमिळनाडूतील इरुळचे खासदार MDMK चे नेते गणेशमूर्ती यांनी अखेरचा श्वास घेतला. 24 मार्च रोजी त्यांनी आपल्या राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. कुटुंबीयांनी त्यांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयात अनेक नेते पदाधिकारी यांनी त्यांची भेट घेतली. परंतु आज पहाटेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ए गणेश मूर्ती हे 77 वर्षांचे होते.
कोण आहेत ए गणेशमूर्ती
ए गणेश मूर्ती हे तमिळनाडूमधील इरोडचे खासदार आहेत. मारू मलारची द्रविड मुन्नेत्र कळघम MDMK चे नेते होते. त्यांची राजकीय कारकीर्द ही मोठी आहे. ए गणेशमूर्ती हे तीन वेळा लोकसभेचे खासदार राहिले आहेत. यावेळी त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी विचारात घेतले जाईल असं त्यांना सांगण्यात आलं होतं. पण ऐनवेळी त्यांचे तिकीट नाकारलं गेलं. यातून मानसिक त्रासाचे ते शिकार ठरले आहेत. 24 मार्च रोजी त्यांनी आपल्या राहत्या घरात याच मानसिक त्रासातून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला असं समजत आहे. चार दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिली आणि आज अखेर त्यांची प्राणजोत मालवली आहे.