अंतरवली सराटी : एक मोठी बातमी समोर येते आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी आपले उपोषण अखेर मागे घेतले आहे. त्याबरोबरच त्यांनी उपचार देखील घेणार असल्याचं स्पष्ट केला आहे.
मराठा आरक्षणाच्या आपल्या मागणीसाठी 10 फेब्रुवारीला मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. दरम्यान सतराव्या दिवशी आज त्यांनी उपोषण मागे घेऊन उपचार घेणार असल्याच म्हटल आहे. काही वेळातच ते गावातील आपल्या सहकाऱ्यांच्या हातून फळांचा रस घेऊन उपोषण मागे घेणार असल्याचं समजत आहे.
काल मनोज जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. यावेळी जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप करत म्हटले होते की, ‘ फडणवीसांना आपल्याला मारायचे आहे. सलाईन मधून ते मला विश देणार आहेत. त्यामुळे मी सलाईन घेत नाही. मी सागर बंगल्यावर येतो. मला मारून दाखवा. ‘ असं जरांगे पाटील म्हणाले होते. त्यानंतर ते मुंबईच्या दिशेने रवाना देखील झाले होते.
Maratha Reservation : ” मनोज जरांगे यांची नार्को टेस्ट करा…!” नितेश राणेंची संतप्त भूमिका, नेमकं काय म्हणाले ? वाचा सविस्तर
दरम्यान अंबडमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजी नगर जालना या जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा देखील स्थगित करण्यात आली आहे. यानंतर जरांगे पाटील यांनी पुन्हा अंतरवली सराटीकडे जाण्याचा निर्णय घेतला. तर आता ते आपल उपोषण मागे घेत असल्याचे देखील त्यांनी म्हटल आहे.
दरम्यान आंदोलनाची आता पुढची दिशा देखील ते लवकरच जाहीर करणार आहेत. दोन-तीन दिवस उपचार घेतल्यानंतर पुन्हा एकदा ते महाराष्ट्राचे दौरे करणार असून उद्यापासून धरणे आणि साखळी उपोषण करा असं त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितल आहे.