जालना : मराठा समाजाला Maratha Society ओबीसी OBC मधून सरसकट आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी आमरण उपोषण, सभा, मोर्चे अशी सर्वच हत्यार उपसले आहेत. देव जरी आडवा आला तरीही ओबीसीतून मराठा आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही एवढी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. तसेच 20 जानेवारीला मुंबईमध्ये उपोषण सुरु केले जाणार आहे.
दरम्यान आतापर्यंत राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मध्यस्थाची भूमिका घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्याशी अनेक बैठका घेतल्या. यामध्ये सरकारला यश आले नाही. त्यामुळे आता मुंबईतील उपोषणावर जरांगे पाटील ठाम असून आता पुढे काय होणार ? या चर्चेमध्ये महाराष्ट्र गुंतलेला असताना एक मोठी बातमी समोर येते आहे. असं लेखी आश्वासन सरकारच्या शिष्टमंडळाने ओबीसी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाला दिला असल्याचा मोठा दावा ओबीसी राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवडे यांनी केला आहे.
जालन्यामध्ये वडागांद्रा येथील ओबीसी बचाव साखळी उपोषण दरम्यान बबनराव तायडे हे उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना तावडे म्हणाले की, “ओबीसी प्रतिनिधी यांच्या शिष्टमंडळाने सरकारची 29 सप्टेंबर रोजी भेट घेतली होती. यावेळी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याचे लेखी आश्वासन सरकारने दिले आहे. सोबतच, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ असे सरकारने आजपर्यंत कुठेही म्हटले नाही. सरकारने आपल्याला दिलेला हा शब्द तीन महिन्यांपासून बदललेला नाही. त्यामुळे आम्हाला सरकारवर विश्वास आहे, असे बबनराव तायवाडे म्हणाले.
दरम्यान आता तायवडे यांच्या या वक्तव्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण कसे मिळणार ? गेल्या तीन महिन्यांमध्ये सरकारने दिलेला शब्द बदललेला नाही. असे देखील तावडे यांनी ठामपणे सांगितले आहे. त्यामुळे ओबीसीतून मराठा आरक्षण हे वादळ वाढतानाच दिसून येते आहे.