बारामती : बारामती लोकसभा मतदार संघातून Baramati Lok Sabha constituency आरोप-प्रत्यारोप, नाराजी, बंडखोरी ही नाट्य आता हळूहळू कमी होत आहेत. विजय शिवतारे Vijay Shivtare यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याच ठरवलं. यावेळी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांनी मध्यस्थी केली. आणि त्यानंतर विजय शिवतारे यांनी माघार घेतली आहे. तर भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील Harshvardhan Patil यांनी देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा केल्यानंतर आणि एका अटीवर आपली नाराजी संपली असं जाहीर केले.
नेमकी अट काय ?
हर्षवर्धन पाटील हे भाजपचे नेते आहेत. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी ते त्यांच्या सागर बंगल्यावर गेले होते. या ठिकाणी तब्बल दोन तास या दोघांमध्ये चर्चा झाली आणि चर्चेनंतर त्यांची नाराजी दूर झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. परंतु यासाठी त्यांनी अट ठेवली आहे ती म्हणजे लोकसभेत जी मदत केली जाईल त्याची परतफेड विधानसभेत इंदापुरात मागू असं त्यांनी म्हटलं आहे. अर्थात बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मताधिक्य मिळवून देण्याचं आश्वासन दिलं असलं तरी त्याची परतफेड विधानसभेत करून घेऊ या आश्वासनावरच त्यांनी आपली नाराजी सोडली आहे.
Lok Sabha Elections 2024 : अहमदनगरमधून निलेश लंकेंची लोकसभा निवडणुक लढवणार असल्याची घोषणा; आमदारकीचा राजीनामा देताना अश्रू अनावर
बारामतीतून एकंदरीतच दोन्हीही नेत्यांची बंडखोरी होणार नाही याची काळजी देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. पण आता पुढे इंदापूर विधानसभा मतदारसंघात अजित पवारांचे खास असलेले दत्ता भरणे यांनी पाटील यांचा दोन वेळा पराभव केला. आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र आहे. त्यामुळे पाटील यांना उमेदवारी मिळेल का असा सवाल उपस्थित होत असतानाच हर्षवर्धन पाटील यांनी आपली बाजू भक्कम करून घेतली आहे.