मुंबई : गेली अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये कळीचा मुद्दा होता तो म्हणजे मराठा आरक्षण ! मराठा आंदोलकी मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी मधून आरक्षण मिळावं अशी मागणी केली होती. त्यानुसार मुंबई मधल्या आंदोलनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यादेशाद्वारे मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य असल्याचं सांगितलं होतं. हा विषय नक्कीच जर-तरचा होता. कारण जर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलं गेलं, तर ओबीसी समाजामध्ये देखील अस्वस्थता निर्माण होऊ शकते. आणि आंदोलन सुरू होऊ शकते. याचा अंदाज अनेक नेते आणि तज्ञांनी व्यक्त केला होता. दरम्यान आता ओबीसी महासंघाने आज पासून जनजागृती रथयात्रा सुरू केली आहे.
राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत जो अध्यादेश काढला आहे. त्यामुळे ओबीसी संघटनांनी चिंता व्यक्त केली असून राज्य सरकारच्या या निर्णयाबाबत निषेध व्यक्त करण्यात येतो आहे. त्यामुळे आता ओबीसी समाजाला धीर देणे आणि सरकारवर दबाव आणणे यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने देखील आजपासून जनजागृती रथयात्रा सुरू केली आहे.
https://www.facebook.com/share/v/hox6pT5k9yP5Zczz/?mibextid=jmPrMh
कशी असणार ही रथयात्रा
आज पासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाची जनजागृती रथयात्रा सुरू झाली. दीक्षा भूमीवरून सुरू झालेली ही जनजागृती रथयात्रा विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये 31 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत फिरणार आहे. अशी माहिती ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी दिली आहे.