नवी दिल्ली : काल संसद भवन Parliament Building येथे झालेल्या प्रकारानंतर केंद्र सरकार आणि तपास यंत्रणा सतर्क झाली आहे. काय अचानक लोकसभा सुरु असताना दोन तरुणांनी सभागृहात उडी मारली. त्यानंतर बुटात लपवून ठेवलेल्या धुराच्या नळकांड्यांमधून धूर देखील पसरवला. दरम्यान या दोन्हीही तरुणांना सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान या दोन्हीही तरुणांना सदस्यांनी देखील बेदम चोप दिला आहे. या घटनांचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. अधिक तपास या प्रकरणाचा सुरु असून सुरक्षेतील त्रुटीमुळे सात कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
संसद भवनाच्या सुरक्षेत बुधवारी मोठी चूक झाली. सभागृहाचे कामकाज सुरू असताना लोकसभेत खासदारांच्या मधोमध दोन तरुणांनी अभ्यागत गॅलरीतून उडी मारली. यातील एका तरुणाने पाठीमागून उडी मारून खासदारांमध्ये जाऊन बूटमधून स्प्रे काढून संपूर्ण सभागृह धूर केला. सुरक्षा भंगाच्या घटनेनंतर संसदेत सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मकर गेटमार्गे केवळ खासदारांना संसद भवनात प्रवेश दिला जात असून इमारतीत प्रवेश करणाऱ्या सर्व व्यक्तींचीबूट काढून कसून तपासणी केली जात आहे. लोकसभा सचिवालयाने कालच्या सुरक्षेतील त्रुटीमुळे सात कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
संसदेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे निर्बंध असणार
- संसदेत प्रवेशावर कठोर निर्बंध असणार
- सर्व प्रवेशद्वारांवर बॉडी स्कॅनर बसवले जाणार
- खासदारांच्या PA ला देखील संसदेत प्रवेश बंदी