Twitter become X : ट्विटर सीईओ एलॉन मस्क नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. त्याचप्रमाणे ट्विटरमध्ये काही ना काही बदल करतो. यावेळेस मस्कने ट्विटरचे नावच बदलले आहे. मस्कने ट्विटरचे नाव आता X केले आहे. Twitter चे डोमेन देखील Twitter.com वरून X.com असे बदलण्यात आले आहे. तुम्ही x.com ला भेट दिल्यास ते तुम्हाला twitter.com वर रीडायरेक्ट करेल. एलॉन मस्कने यासंदर्भात ट्विट (Elon musk tweet) देखील केलं आहे. ट्विटर आता X म्हणून ओळखले जाईल.
मस्कने केले ट्विट (Elon musk tweet)
And soon we shall bid adieu to the twitter brand and, gradually, all the birds
— Elon Musk (@elonmusk) July 23, 2023
एलॉन मस्कने ट्विटरचा लोगो बदलण्याची तयारीसद्धा केली आहे. मस्कने ट्विट करून या बदलाचे संकेत दिले आहेत. मस्कने लिहिले की, लवकरच आम्ही ट्विटर ब्रँडला आणि हळूहळू सर्व पक्ष्यांना निरोप देऊ. एलॉन मस्कने त्याच्या ट्विटर प्रोफाइलमध्ये X लोगो देखील टाकला आहे. याआधी एलॉन मस्कचा फोटो होता.
मस्कची ट्विटरवरून कमाई करण्याची धडपड (Twitter become X )
एलॉन मस्कने गेल्या वर्षी सुमारे 44 अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर विकत घेतले. तेव्हापासून तो ट्विटरवरून कमाई करण्यासाठी सारखी धडपड करत आहे. एलॉन मस्कने आत्तापर्यंत कमाईसाठी काही ना बदल केले आहे.
१. ट्विटर वापरकर्त्यांना ब्लू टिक हवे असल्यास त्यासाठी त्यांना पैसे द्यावे लागतात.
२. एलॉन मस्कने फ्री अकाऊंटवरून ट्विट पाहण्यावरही मर्यादा घातली आहे.
३. तसेच डायरेक्ट मेसेजसाठी पैसे द्यावे लागतील.
४. एलॉन मस्क ट्विटरचा मालक बनताच अनेक उच्च अधिकाऱ्यांना काढून टाकले.
५. एलॉन मस्क लवकरच ट्विटरचा नवीन लोगो देखील जारी करू शकतात.
ट्विटर सुपर अॅपप्रमाणे काम करेल
ट्विटर बऱ्याच काळापासून तोट्यात चालले होते. त्याचवेळेस एलॉन मस्कने भरपूर पैसे देऊन ते विकत घेतले. म्हणूनच मस्कला यातून भरपूर पैसा मिळवायचा आहे. म्हणूनच मस्क ट्विटरमध्ये नवीन बदल करत आहेत. ट्विटरमध्ये बदल एप्रिल महिन्यापासूनच सुरू झाला होता. एलॉन मस्कने आधीच सांगितले होते की, ट्विटर पूर्णपणे बदलणार आहे. आतापासून ट्विटर सुपर अॅपप्रमाणे काम करेल.