Threads : मेटा सीईओ मार्क झुकरबर्गने थ्रेड अॅप लॉन्च (Treads app launched) केलंय. इंस्टाग्राम टीमनेच थ्रेड्स सुरू केलंय. थ्रेड्समध्ये रिअल टाइम फीड देखील उपलब्ध असेल. थ्रेड्सची वैशिष्ट्ये आणि इंटरफेस ट्विटरसारखेच आहेत. ते कसे वापरायचे ते जाणून घ्या. थ्रेड्स हे एक सोशल मीडिया अॅप आहे, जे थेट एलॉन मस्कच्या ट्विटरशी स्पर्धा करते. मेटा सीईओ मार्क झुकरबर्गने हे अॅप लॉन्च केलंय. इंस्टाग्राम टीमनेच थ्रेड्स विकसित केले आहेत. थ्रेड्समध्ये रिअल टाइम फीड देखील उपलब्ध असेल. थ्रेड्सची वैशिष्ट्ये (threads features) आणि इंटरफेस ट्विटरसारखेच (twitter) आहेत.
थ्रेड्ससह ब्लू टिक देखील उपलब्ध असेल
थ्रेड्स आता भारतातही उपलब्ध झालंय. गुगल प्ले-स्टोअरवरून थ्रेड्स डाउनलोड केलं जाऊ शकतात. जर तुमच्याकडे इंस्टाग्रामवर आधीपासून ब्लू टिक असेल म्हणजेच तुमचे इंस्टाग्राम खाते आधीच असेल तर थ्रेड्स खाते स्वयंचलितपणे सुरू केले जाईल. तुम्ही Apple च्या App Store वरून थ्रेड्स मोफत डाउनलोड देखील करू शकता. थ्रेड्समध्ये, तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम आयडीने लॉग इन करू शकता. तसेच अॅंड्रॉइड मोबाईलवरही हे अॅप तुम्ही वापरू शकता.
थ्रेड्स कसे वापरावे
मेटाचे इंस्टाग्राम अॅप हे फोटो-शेअरिंग मल्टीमीडिया प्लॅटफॉर्म आहे, तर थ्रेड्स हे ट्विटरसारखच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. जर तुम्ही ट्विटर वापरत असाल तर तुम्हाला थ्रेड्सचा त्रास होणार नाही. हे अगदी जुन्या ट्विटरसारखे आहे. थ्रेड्समध्ये, वेब लिंक्स, फोटो (एकावेळी 10 फोटोंपर्यंत) आणि पाच मिनिटापर्यंतचे व्हिडिओ शेअर करू शकतात. तुम्ही थ्रेड्समध्ये एखाद्याला ब्लॉक आणि फॉलो देखील करू शकता. जर तुम्ही एखाद्याला इंस्टाग्रामवर ब्लॉक केले असेल, तर ते थ्रेड्सवरही ब्लॉक राहतील. यात सध्या डायरेक्ट मेसेजिंगची सुविधा नाही. तसेच GIFS समर्थन आणि क्लोज फ्रेंड सध्या थ्रेड्समध्ये समर्थित नाहीत.
याव्यतिरिक्त, 16 वर्षांखालील (किंवा काही देशांमध्ये 18 वर्षाखालील) वापरकर्त्यांना अॅपमध्ये सामील झाल्यावर स्वयंचलितपणे एक खाजगी प्रोफाइल नियुक्त केले जाईल.
थ्रेडमध्ये त्यांचा उल्लेख कोण करू शकतो किंवा त्यांना प्रत्युत्तर देऊ शकतो यावरही वापरकर्त्यांचे नियंत्रण असेल. याव्यतिरिक्त, 16 वर्षांखालील (किंवा काही देशांमध्ये 18 वर्षाखालील) वापरकर्त्यांना अॅपमध्ये सामील झाल्यावर स्वयंचलितपणे एक खाजगी प्रोफाइल दिलं जाईल. थ्रेडमध्ये त्यांचा उल्लेख कोण करू शकतो किंवा त्यांना कोण प्रत्युत्तर देऊ शकतो यावरही वापरकर्त्यांचे नियंत्रण असेल.