Tata iPhone Manufacture: भारतीय बाजारपेठेतील अग्रगण्य कंपनी असलेली टाटा आता भारतात आयफोनची निर्मिती करणार आहे. त्याचबरोबर टाटा कंपनी मोठ्या रोजगाराची संधी घेऊन आली आहे. आयफोनसोबतच त्याचे कव्हर (आयफोन-केसिंग)ची निर्मितीदेखील कंपनी करणार आहे. त्यासाठी होसुर येथे 500 एकरात फॅक्टरी उभारली जात आहे. तसंच, या फॅक्टरीसाठी 15,000 हून कामगारांना रोजगार देते. मात्र, लवकरच कंपनी या कारखान्याचा विस्तार करत असल्यामुळं रोजगाराच्या संधी दुप्पट होण्याची शक्यता आहे. (Tata iPhone Manufacture tata expand iphone casing manufacturing facility in india tech news)
टाटा कंपनी आयफोन बरोबरच आयफोन-केसिंगचीही निर्मिती करणार असल्याच्या चर्चा आहे. त्यामुळं या विस्तासाठी 25,000 ते 28,000 नवीन रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतातील टाटा समूहासाठी एक मोठी गुंतवणूक ठरणार असून यामुळं देशातील इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला लक्षणीय चालना मिळेल, असं एका रिपोर्टमध्ये नमूद केलं आहे.
द इकोनॉमिक टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, कंपनीने अलीकडेच खरेदी केलेल्या आयफोन असेंबलली प्लांटची सुरुवात करण्याआधी कामगारांची चाचपणी करण्याची कंपनीची योजना आहे. टाटा इलेक्ट्रॉनिक्सनुसार, आयफोनचा हा प्लांट कंपनीला इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात एक प्रमुख दावेदार बनण्यास मदत करेल. रिपोर्टनुसार, टाटाचा हा नवीन प्लांट मुख्यतः अॅपल फोन कम्पोनेंटचं उत्पादन करेल.
हे ही वाचा – Gautam Singhania : सध्या चर्चेत असणारे गौतम सिंघानिया कोण? जाणून घ्या
भारतात अॅपलच्या स्मार्टफोनची निर्मिती हे टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या विस्तारासाठीची प्रमुख रणनितीचा एक भाग आहे. टेक्नोलॉजी मार्केटमध्ये एनालिस्टने दिलेल्या माहितीनुसार, अॅपल कंपनी त्यांचे उत्पादन चीनपासून दूर ठेवण्यास वचनबद्ध आहे. भारताची वाढती बाजारपेठ आणि कुशल कामगार शक्ती हा कंपनीसाठी एक चांगला पर्याय ठरत आहे.
भारतीय बाजारपेठेचा विकास वेगाने होत आहे. अॅपलनेही या माहितीला दुजारा दिला आहे. कंपनीने भारतात आयफोनची विक्री करुन नेहमीच चांगला नफा कमावला आहे. जून ते सप्टेंबर या तिमाहीत अॅपलने भारतात रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. कंपनीने भारतात आयफोन, मॅक आणि अॅप्सच्या विक्रीत वाढ होत असल्याचे म्हटलं आहे, अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी अलीकडेच भारतातचे महत्त्व स्वीकारले होते. त्यांनी म्हटलं आहे की, भारत एक महत्त्वपूर्ण बाजारपेठ आहे आणि अॅपल भारतात आपला व्यापार वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.