अॅपलने काल रात्री आपल्या मेगा इव्हेंटमध्ये (Apple Wonderlust Event 12) नवीन आयफोन सीरिज (Apple iPhone 2023 series) सादर केली आहे. नव्या सीरिजमध्ये अॅपलने आयफोनचे चार नवे मॉडेल्स सादर केले आहेत. यासोबतच सीरिजच्या सर्व मॉडेल्सची किंमतही जाहीर करण्यात आली आहे.
भारतात अॅपल आयफोन 15 सीरिजची किंमत किती आहे ?

अॅपल आयफोन 15 सीरिजची किंमत भारतात 79,900 रुपयांपासून सुरू होते आणि 1,99,900 रुपयांपर्यंत जाते. आयफोन 15 आणि आयफोन 15 प्लस तीन स्टोरेज व्हेरियंटमध्ये आणण्यात आले आहेत. दुसरीकडे, आयफोन 15 प्रो चार स्टोरेज व्हेरियंटसह खरेदी केला जाऊ शकतो. आयफोन 15 प्रो मॅक्स तीन स्टोरेज व्हेरियंटमध्ये खरेदी करता येईल.
- आयफोन 15
- 128 जीबी: 79,900 रुपये
- 256 जीबी: 89,900 रुपये
- 512 जीबी: 1,09,900 रुपये
- आयफोन 15 प्लस
- 128 जीबी: 89,900 रुपये
- 256 जीबी: 99,900 रुपये
- 512 जीबी: 1,19,900 रुपये
- आयफोन 15 प्रो
- 128 जीबी : 1,34,900 रुपये
- 256 जीबी: 1,44,900 रुपये
- 512 जीबी: 1,64,900 रुपये
1 टीबी: 1,84,900 रुपये
- आयफोन 15 प्रो मॅक्स
- 256 जीबी : 1,59,900 रुपये
- 512 जीबी: 1,79,900 रुपये
1 टीबी: 1,99,900 रुपये