World cup 2023 Schedule : आंतरराष्ट्रीय क्रिकेट कमिटी (ICC) आणि भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड यांच्यामार्फत मंगळवारी (२७ जून) पत्रकार परिषद घेत यंदाच्या क्रिकेट विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली. यंदा वर्ल्ड कपचे सर्व सामने भारतातील एकूण १० स्टेडियमवर होणार आहेत. त्यापैकी २ स्टेडियम हे महाराष्ट्रातील असणार आहेत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात या भारतात वर्ल्ड कपचे सामने होणार आहेत.
कसं असेल वर्ल्ड कपचं वेळापत्रक? (When ODI world cup will start)
वर्ल्ड कपच्या सामन्यांची सुरुवात ५ ऑक्टोबरला इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड या सामान्याने होणार आहे. तर अंतिम सामना १९ नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. विशेष म्हणजे यंदाच्या वर्ल्ड कपची पहिली आणि शेवटची मॅच अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमला होणार आहे.
या वेळापत्रकानूसार १५ नोव्हेंबरला पहिली सेमीफायनल आणि १६ नोव्हेंबरला दुसरी सेमीफायनल मॅच असणार आहे. मुंबई आणि कोलकाता येथील स्टेडियममध्ये सेमीफायनलचे सामने खेळवले जातील. सेमीफायनलचे सामने कोणत्या स्टेडियमवर घ्यायचे यावरून काहीसा गोंधळ आहे. भारत सेमीफायनलमध्ये गेला तर हा सामना मुंबई मध्येच होईल. मात्र, जर भारत आणि पाकिस्तान असा सेमीफायनलचा सामना लागला तर हा सामना कोलकातामध्ये होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
विश्वचषकाचे सामने दिल्ली, हैद्राबाद, लखनऊ, धर्मशाळा, चन्नई, बंगळुरू, कोलकाता, अहमदाबाद सहित पुणे आणि मुंबईच्या स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कधी? (India vs Pakistan in World cup)
१५ ऑक्टोबरला भारत विरुद्ध पाकिस्तान हा वर्ल्ड कपचा सर्वात मोठा सामना होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये होणार आहे. हा सामना पाहण्यासाठी १ लाखाहून अधिक दर्शक येण्याची शक्यता आहे.
वर्ल्ड कपचा टाइम टेबल जाहीर करण्यात थोडा उशीर झाला आहे. कारण वेन्यूवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डकडून आक्षेप घेतला गेला होता अशी चर्चा आहे. पाकिस्तानने चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलिया आणि बंगळुरूला अफगाणिस्तान सोबतच्या मॅच शिफ्ट करण्यास सांगितले होते. मात्र ICC आणि भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डने पाकिस्तानला हवे ते बदल न करताच वेळापत्रक जाहीर केलं आहे.
वर्ल्ड कपमध्ये भारताचे सामने कधी आणि कुणासोबत? (India matches in World cup)
वर्ल्ड कपमधील भारताचा पहिला सामना ८ ऑक्टोबरला खेळला जाईल. हा सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा असणार आहे. चेन्नईला हा सामना खेळला जाणार आहे.
या वर्ल्ड कपमध्ये फायनल आणि सेमीफायनल सोडून भारताच्या एकूण ९ मॅचेस असणार आहेत.
८ ऑक्टोबर – भारत विरुद्ध आस्ट्रेलिया ( चन्नई )
११ ऑक्टोबर – भारत विरुद्ध अफगाणिस्थान (दिल्ली )
१५ ऑक्टोबर – भारत विरुद्ध पाकिस्तान (अहमदाबाद)
१९ ऑक्टोबर – भारत विरुद्ध बांगलादेश (पुणे)
२२ ऑक्टोबर – भारत विरुद्ध न्यूझीलंड (धर्मशाळा)
२९ ऑक्टोबर – भारत विरुद्ध इंग्लंड (लखनऊ)
०२ नोव्हेंबर – भारत विरुद्ध क्वालिफायर २ (मुंबई)
०५ नोव्हेंबर – भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका (कोलकत्ता)
११ नोव्हेंबर – भारत विरुद्ध क्वालिफायर १ (बंगळुरू)
महाराष्ट्रात किती सामने होणार? (World cup match in Maharshtra)
वर्ल्ड कप २०२३ च्या एकुण सामन्यांपैकी महाराष्ट्रात १० सामने खेळले जाणार आहेत. यापैकी ९ सामने साखळी फेरीतील असतील आणि १ सामना उपांत्य फेरीचा असेल. भारताच्या २ साखळी सामन्यांचाही यात समावेश आहे. महाराष्ट्रातील पहिला सामना १९ ऑक्टोबरला बांग्लादेश सोबत पुण्यात असेल. तर दुसरा २ नोव्हेंबरला दुसरा क्वालिफायर मुंबईला होणार आहे.
पुण्यातील गुहंजे आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरील सामने (World cup match in Pune)
वर्ल्ड कपचे एकूण ५ सामने हे पुण्यातील गुहंजे आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहेत. ते पुढील प्रमाणे :
१९ ऑक्टोबर – भारत विरुद्ध बांगलादेश
३० ऑक्टोबर – अफगाणिस्तान विरुद्ध क्वालिफायर २
१ नोव्हेंबर – न्यझीलँड विरुद्ध दक्षिण आफ्रिका
८ नोव्हेंबर – इंग्लंड विरुद्ध क्वालिफायर १
१२ नोव्हेंबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील सामने (World cup match in Mumbai)
वर्ल्ड कपचे ५ सामने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत. त्यापैकी एक सेमीफायनलचा सामना असणार आहे.
२१ ऑक्टोबर – इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका
२४ ऑक्टोबर – दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश
२ नोव्हेंबर – भारत विरुद्ध क्वालिफायर २
७ नोव्हेंबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान
१५ नोव्हेंबर – पहिला सेमीफायनल
वर्ल्डकपचं संपूर्ण वेळापत्रक

विश्वचषकाचे सर्व सामने दुपारी २ वाजता सुरु होतील आणि रात्री १०:३० पर्यंत संपतील अशी शक्यता दर्शवली जात आहे. पावसाचा विचार करून सामने अर्धा तास अगोदरच सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महत्वाचं म्हणजे सेमीफायनल आणि फायनलच्या सामन्याच्या दिवशी पाऊस आला तर तो सामना दुसऱ्या दिवशी खेळवला जाणार आहे. ICC ने या तिनही महत्वाच्या सामन्यांसाठी दिवस रिजर्व केलेले आहेत.