World Cup 2023 : न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार अष्ट पैलू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे किवी संघाविरुद्ध मैदानात उतरणार नाही. कर्णधार रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांच्यासमोर मोठा प्रश्न आहे की, हार्दिकच्या जागी कोणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी द्यायची? हार्दिकची जागा घेण्याच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या तीन खेळाडूंची नावे आम्ही तुम्हाला सांगतो.
- सूर्य कुमार यादव
हार्दिक पांड्याच्या जागी सूर्यकुमार यादव हा चांगला पर्याय ठरू शकतो. सूर्याकडे आपल्या फलंदाजीने कोणत्याही सामन्याची दिशा बदलण्याची क्षमता आहे. यासोबतच मधल्या षटकांमध्ये रनरेट कायम ठेवत डाव विणण्याचे कौशल्यही सूर्यकुमारकडे आहे. मात्र सूर्यकुमारला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाल्यास भारतीय संघाला तज्ज्ञ वेगवान गोलंदाजाचा संघात समावेश करावा लागेल. - ईशान किशन
हार्दिक पंड्याच्या जागी ईशान किशनही शर्यतीत आहे. ईशानने मधल्या फळीत खेळून आपली क्षमता सिद्ध केली आहे. अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात इशानने ही ४७ धावांची दमदार खेळी केली होती. त्यामुळेच हार्दिकच्या जागी कर्णधार रोहितही ईशानला आजमावू शकतो. - रविचंद्रन अश्विन
हार्दिक पंड्याच्या जागी कर्णधार रोहित शर्मा देखील रविचंद्रन अश्विनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देऊ शकतो. अश्विनच्या संघात येण्याने एक गोलंदाज वाढेल, त्याचबरोबर अश्विनही चांगली फलंदाजी करतो. हार्दिक संघात नसेल तर शार्दुल आणि अश्विन या दोघांनाही अंतिम अकरात संधी मिळू शकते. भारतीय संघाला रविवारी म्हणजेच २२ ऑक्टोबरला न्यूझीलंडशी सामना करावा लागणार आहे.