अहमदाबाद : आज तो ऐतिहासिक सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळाला जातो आहे. आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 (World Cup 2023) अंतिम सामन्यात टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया लढत होते आहे. या सामन्याला दुपारी 2 वाजता अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस उडवण्यात आला. नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने गेला. कॅप्टन पॅट कमिन्स याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.
या सामन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राजकीय विश्वातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत. तसेच क्रिकेट चाहतेही उत्सुक आहे.
हे वाचलेत का ? World Cup 2023 Final : 20 वर्षांनंतर फायनलमध्ये India आणि Australia आमनेसामने, दोन्ही संघ थोड्याच वेळात मैदानात उतरणार !
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया प्लेइंग 11
भारत : रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अश्विन
विश्वचषक २०२३ मध्ये कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनशी फारशी छेडछाड केलेली नाही. हार्दिक बाहेर पडल्यानंतर रोहित प्रत्येक सामन्यात त्याच अकरा खेळाडूंसह मैदानात उतरला आहे. मात्र भारतीय कर्णधार ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात मास्टर स्ट्रोक खेळण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या विजेतेपदाच्या सामन्यात रोहित आर अश्विनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देऊ शकतो.
भारताच्या फलंदाजी क्रमात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. रोहित शर्मा आणि शुभमन गिल संघाला धमाकेदार विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरले आहेत, तर विराट कोहलीने तिसऱ्या क्रमांकावर आपले काम चोख बजावले आहे. श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांचा उत्कृष्ट फॉर्म टीम इंडियासाठी सुवर्णसंधी आहे. मात्र, विजेतेपदाच्या लढतीत सूर्यकुमार यादवकडूनही संघाला मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.