मुंबई : श्रीलंका क्रिकेटचे सदस्यत्व निलंबित केलं आहे, आयसीसीने वर्ल्ड कप 2023 दरम्यान श्रीलंका सरकारने क्रिकेट बोर्ड बरखास्त केलं होतं. त्यानंतर आयसीसीने आपल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये, श्रीलंका क्रिकेट स्वतंत्रपणे आपला कारभार पाहू शकत नसल्याचं म्हटलं आहे. आयसीसीने यांसदर्भात ट्विट करत माहिती दिलीये.
श्रीलंका क्रिकेट संघाच्या खराब कामगिरीमुळे श्रीलंकेच्या संसदेने श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला. त्याला सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी पूर्ण पाठिंबा दिला. क्रीडा मंत्री रोशन रणसिंघे यांनी श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त केलं होतं. त्यानंतर श्रीलेकेचा माजी वर्ल्ड कप विजेता कर्णधार अर्जुन रणतुंगा यांची क्रिकेट बोर्ड चालवण्यासाठी सात सदस्यीय अंतरिम समितीचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली होती.
आयसीसीची बैठक पार पडली यामध्ये श्रीलंका क्रिकेट बोर्ड सदस्य म्हणून नियमांचं उल्लंघन करत आहे. विशेष करून श्रीलंका क्रिकेट बोर्डाने कारभार किंवा प्रशासनात सरकारी हस्तक्षेप होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. 21 नोव्हेंबर रोजी आयसीसी बोर्डाची बैठक होणार आहे, त्यानंतर पुढील पावले उचलली जातील आणि अटी ठरवल्या जातील, असं आयसीसीने म्हटलं आहे.