या वर्ल्ड कपमध्ये एका दिवशी दोन सामने होणार आहेत. त्यामुळे सकाळच्या सामन्यांचा टॉस हा 10.00 वाजता होणार आहे. त्यानंतर दोन्ही देशांचे राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतर सकाळी 10.30 वाजता सामना सुरु होणार आहे. पण भारताचे या वर्ल्ड कपमध्ये सामने दुपारी होणार आहेत. दुपारच्या सामन्यांचा टॉस हा 1.30 मिनिटांनी होईल. त्यानंतर हा सामना अर्ध्या तासाने म्हणजेच दुपारी 2.00 वाजता सुरु करण्यात येणार आहे.
या वर्ल्ड कपमधील सामने हे स्टार स्पोर्ट्स वाहिन्यांवर पाहायला मिळणार आहे. स्टार स्पोर्ट्स समुहाकडून इंग्रजी आणि हिंदी अशा दोन भाषांमधून वर्ल्ड कपचे सामने लाइव्ह पाहायला मिळू शकतात. जर तुम्हाला वेब स्टाईट किंवा अॅपवर हा सामना पाहायचा असेल तर त्यासाठी Disney+Hotstar वर तुम्हाला हे सामने पाहता येतील. स्टार स्पोर्ट्स चॅनेलसाठी पैसे मोजावे लागतील.
पण जर हा सामना तुम्ही मोबाईलमध्ये Disney+Hotstar वर पाहिलात तर तो तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळू शकतो. कारण हा सामान जर अन्यत्र कुठे पाहायचा असेल तर त्यासाठी पैसे मोजावे लागतील. पण हा सामना त्यांच्या अॅपवर फ्रीमध्ये दाखवला जाणार आहे. त्यामुळे मोबाईलवर आता तुम्हाला फ्रीमध्ये हा सामना पाहायला मिळू शकतो.