दुबई : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 2024 हंगामाचा लिलाव मंगळवारी 19 डिसेंबर रोजी दुबईतील कोका-कोला एरिना येथे होणार आहे. यामध्ये एकूण 333 खेळाडूंचा लिलाव होणार असून संघांना 77 स्लॉट आहेत. त्यापैकी 30 विदेशी खेळाडूंसाठी राखीव आहेत.
यामध्ये 23 खेळाडूंनी 2 कोटी रुपयांच्या ब्रॅकेटमध्ये स्वतःची नोंदणी केली आहे तर 13 खेळाडूंची नोंदणी 1.5 कोटी रुपयांच्या स्लॉटमध्ये करण्यात आली आहे. 333 खेळाडूंपैकी 214 भारतीय आणि 119 विदेशी खेळाडू आहेत. तसेच त्यामध्ये दोन सहयोगी देशांचा समावेश आहे. यंदाच्या वर्षी गुजरात टायटन्स 38.15 कोटी रुपयांच्या सर्वाधिक पर्ससह लिलावात प्रवेश करेल, तर राजस्थान रॉयल्सकडे सर्वात कमी 14.5 कोटी रुपयांची पर्स आहे.
IPL 2024 लिलाव भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता सुरू होईल. स्टार स्पोर्ट्स हे IPL 2024 लिलावाचे अधिकृत प्रसारक आहे. तसेच IPL 2024 लिलावाचे लाइव्ह स्ट्रीमिंग JioCinema अॅप आणि वेबसाइटवर पाहता येईल.