India vs England Test Series : भारत आणि इंग्लंडमध्ये 25 जानेवारीपासून पाच सामन्याच्या कसोटी मालिकेला Test Series सुरुवात होते आहे. पहिल्या दोन सामन्यासाठी बीसीसीआयने विराट कोहलीच्या रिप्लेसमेंटची घोषणा केली आहे. दरम्यान विराट कोहलीच्या रिप्लेसमेंटसाठी सरफराज खान याच्या नावाची चर्चा होती. पण BCCI ने रजत पाटीदार याला संधी दिली आली आहे. सरफराज खान इंडिया अ संघासोबतच राहणार आहे.
BCCI ने विराट कोहलीच्या जागी पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी आरसीबीच्या रजत पाटीदार याला संधी दिली आहे. भारताचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यातून वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली.