India vs Bangladesh : आयसीसी विश्वचषक २०२३ मध्ये टीम इंडियाचा विजय कायम आहे. पुण्यात झालेल्या एकतर्फी सामन्यात रोहितच्या संघाने बांगलादेशचा ७ गडी राखून पराभव केला. या विजयाचा हिरो होता विराट कोहली, ज्याने चांगली फलंदाजी करत शतक झळकावले.विराट आपले शतक पूर्ण करण्यासाठी खूप आतुर दिसत होता, ज्याला पाहून भारतीय खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये जोरजोरात हसताना दिसले. किंग कोहलीचे शतक पूर्ण होण्यात अंपायरचेही योगदान होते, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर आगीसारखा पसरला आहे.
कोहलीच्या शतकामध्ये पंचांचे योगदान ?
खरं तर विराट कोहली 97 धावांसह क्रीजवर उपस्थित होता आणि त्याला शतकासाठी 3 धावांची गरज होती. मात्र भारतीय संघ लक्ष्याच्या अगदी जवळ होता आणि विजयासाठी फक्त 2 धावा शिल्लक होत्या. नासुमने 42 व्या षटकाचा पहिला चेंडू लेग साईडवर फेकला, जो स्टंपच्या बाहेर जाताना दिसला. मात्र, असे असूनही अंपायरने चेंडू रुंद घोषित केला नाही, तर रिप्लेमध्ये चेंडू ना विराटच्या बॅटला स्पर्श झाला ना पॅडला स्पर्श झाल्याचे स्पष्ट पणे दिसून आले.
पंचांच्या या निर्णयावर चाहत्यांसह भारतीय शिबिराचा विश्वास बसला नाही. शुभमन गिल आणि कुलदीप यादव ड्रेसिंग रूममध्ये अंपायरच्या निर्णयावर हसताना दिसले. यानंतर विराटने त्याच षटकात षटकार ठोकून आपल्या वनडे कारकिर्दीतील 48 वे शतक पूर्ण केले. अंपायरच्या या निर्णयावर सोशल मीडियावर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
काय सांगतो नियम?
गेल्या वर्षीच क्रिकेटच्या नियमांमध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे वाइड चेंडूचा नियम. गोलंदाज रन अप घेत असताना फलंदाज ज्या ठिकाणी उभा आहे, त्याच लाईनवर गोलंदाजाने चेंडू टाकला आणि चेंडू पडल्यानंतर फलंदाजाने आपली जागा सोडली तर चेंडू वाइड द्यायचा की नाही हे पूर्णपणे अंपायरवर अवलंबून असते. नासुम अहमद ज्यावेळी रनअप घेत होता,त्यावेळी विराट कोहली लेग स्टम्पच्या बाहेर उभा होता. चेंडू टाकताच विराच आत आला. त्यामुळे चेंडू किपरने पकडला. जर तो ऑफ साईडला आला नसता तर चेंडू त्याच्या पॅडला जाऊन धडकला असता. त्यामुळे अंपायरने योग्य निर्णय घेतल असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.
विश्वचषकातील पहिले शतक
50 षटकांच्या विश्वचषकात धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने पहिले शतक झळकावले. बांगलादेशविरुद्ध विराट सुरुवातीपासूनच उत्कृष्ट लयीत दिसत होता आणि त्याने एकाही गोलंदाजाला सोडले नाही. कोहलीने शानदार फलंदाजी करत 97 चेंडूत नाबाद 103 धावांची खेळी करत षटकार ठोकून टीम इंडियाला विजय मिळवून दिला.