IND vs AUS Final 2023 : WORLD CUP 2023 जसप्रीत बुमराहने मिचेल मार्शला बाद करून ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का धक्का दिला. मिचेल मार्श 15 चेंडूत 15 धावा काढून बाद झाला. यामध्ये एक चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. ऑस्ट्रेलिया 2 बाद 41 धावा झाल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियाने आपली ३ री मोठी विकेट देखील गमावली आहे. स्टीव्ह स्मिथ देखील बॅड झाला आहे. आणि यासह दबाव असला तरी भारतीय चाहत्यांमध्ये देखील उत्साह वाढला आहे.
हे वाचलेत का ? World Cup 2023 Final : India vs Australia 240 धावांवर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियासमोर 241 धावांचे लक्ष्य
20 वर्षांनंतर पुन्हा एकदा भारताचा सामना विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण 13 सामने खेळले गेले आहेत. ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध एकूण 8 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर विश्वचषकाच्या इतिहासात भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण 5 सामने जिंकले आहेत. फायनल सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियाचा कर्दनकाळ ठरू शकतो.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया प्लेइंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया : ट्रेव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश एंगलिस, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, अॅडम झम्पा, जोश हेजलवूड.