चीनमधील हांगझोऊमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेट टीम इंडियाची विजयी घौडदौड सुरुच आहे. एशियन गेम्समध्ये सेमीफायनलच्या सामन्यात भारत विरूद्ध बांगलादेश यांच्या सामना रंगला होता. यावेळी टीम इंडियाने 9 विकेट्सने बांगलादेशाचा दारूण पराभव केला आहे. या विजयासोबत टीम इंडियाने फायनलचं तिकीट मिळवलं आहे.
सेमीफायनलच्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी दाखवत बांगलादेशच्या फलंदाजांना केवळ 96 रन्सपर्यंत मजल मारता आली. टीमकडून साई किशोरने सर्वाधिक म्हणजेच 3 विकेट घेतल्या. तर वॉशिंग्टन सुंदरने 2 विकेट्स घेतले.
सेमीफायनलच्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने प्रथम टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी बांगालदेशी खेळाडूंची चांगलीच दाणादाण उडवली.