पंढरपूर : पंढरपुरातील विठ्ठल मंदिरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सध्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जिर्णोद्धाराचं काम सुरू आहे. दरम्यान मंदिरातील हनुमान गेट जवळ एक रहस्यमय अशी गुप्त खोली आढळून आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जिर्णोद्धाराचे कामकाज सुरू असून मंदिरातील हनुमान गेट जवळ एक रहस्यमयी गुप्त खोली सापडली आहे. ही खोली सहा फूट खोल आणि सहा फूट रुंद असून या खोलीमध्ये प्राथमिक माहितीनुसार एक मूर्ती सदृश्य वस्तू आढळून आली आहे.
पुरातत्व विभागाची टीम आज या खोलीमध्ये नेमकं काय आहे हे पाहण्यासाठी जाणार आहे. त्यामुळे या रहस्यमयी अशा गुप्त खोलीमध्ये नेमकं काय सापडतं याकडे आता अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे.