मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांनी लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Elections पार्श्वभूमीवर आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रामध्ये तळ ठोकला. या काळात पंतप्रधानांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर जोरदार टीका देखील केली आहे. दरम्यान या वयात जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार ? अशी खोचक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर केली.
अर्थातच महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दरी निर्माण झाली. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडून आपला मार्ग बदलला. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशी खोचक टीका केली आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हे शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी घनाघाती टीका केली आहे. ते म्हणाले की, पवार साहेबांना त्यांचं कुटुंब जपता येत नाही तर महाराष्ट्राला काय जपणार ? मोदी साहेब तुमच्या तोंडून ही भाषा नाहीतर कुटुंबाबद्दलचे चार शब्द लोकांना पटतील का ? तुमचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर तुम्ही काही महिन्यातच आपल्या पत्नीला सोडलं. अशी तुमची प्रवृत्ती असेल तर कुटुंब काय असतं तुम्हाला काय कळणार ? ” असा खोचक सवाल रोहित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे.