मुंबई : हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे भवन येथे आज पत्रकार परिषदे दरम्यान बोलताना शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेनेचा व्हीप डावलणाऱ्या खासदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
नारीशक्ती वंदन अधिनियम 2023 संदर्भात लोकसभेत झालेल्या मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहून शिवसेनेचा व्हीप डावलणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे समर्थन करणाऱ्या विनायक राऊत, राजन विचारे ,ओमराजे निंबाळकर, आणि संजय जाधव या चार खासदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा खासदार राहुल शेवाळे यांनी दिला. तसेच या चार खासदारांचे निलंबन करण्याबाबतही कायदेशीर सल्ला घेत असल्याचं आणि याबाबत लोकसभा अध्यक्षांना देखील निवेदन देणार असल्याचं राहुल शेवाळे यांनी स्पष्ट केला आहे.
यावेळी खासदार राहुल शेवाळे म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काँग्रेस प्रणित आघाडीतील सर्व खासदारांनी महिला आरक्षण विधेयकाला समर्थन दिल्याचे जाहीर केलं होतं. मात्र वस्तुस्थिती वेगळी असून त्यांच्या आघाडीतील अनेक खासदार या विधेयकाच्या मतदानादरम्यान अनुपस्थित होते. लोकसभेत शिवसेना पक्षाचे प्रतोदपद खासदार भावना गवळी यांच्याकडे असून त्यांनी जारी केलेला शिवसेनेच्या सर्व खासदारांना बंधनकारक असताना 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान आयोजित केलेल्या विशेष अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी खासदार गवळी यांनी पक्षाच्या वतीने सर्व खासदारांना व्हीप जारी केला होता. मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला समर्थन करणाऱ्या चार खासदारांनी या व्हीच उल्लंघन केलं होतं. त्यामुळे या ४ ख्खासदारांवर आता काय कारवाई होते हे येणार काळच ठरवेल.