सातारा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सर्वच प्रमुख नेते दौरे करत आहेत. आज ज्येष्ठ नेते शरद पवार हे साताऱ्यात आहेत. साताऱ्यातील महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. तरीही उदयनराजेंची उमेदवारी महायुतीने निश्चित केली असल्याने आज उदयनराजेंच्या खास स्टाईल मध्ये शरद पवारांनी कॉलर उडवून त्यांना थेट आव्हान दिले.
आज माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार नेमका कोण असणार ? यावर थेट भाष्य केलेलं नाही ते म्हणाले की, ” साताऱ्यातून अनेक जण इच्छुक आहेत. येत्या दोन ते तीन दिवसात अधिकृत उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाईल. तर यावेळी त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना कॉलर उडवून त्यांच्याच स्टाईल मध्ये आव्हान दिल आहे.
Lok Sabha Elections 2024 : साताऱ्यात शरद पवारांचे खळबळजनक विधान ! वंचित बहुजन आघाडीबाबत स्पष्टच सांगून टाकले…
महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला मिळू शकते
सातारा लोकसभा मतदारसंघाची महाविकास आघाडीची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे आहे. अद्याप या जागेवर उमेदवार निश्चित झालेला नाही. खासदार श्रीनिवास पाटील यांनी आरोग्याचे कारण देऊन निवडणुकीतून स्पष्ट माघार घेतली आहे. त्यामुळे आता शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सुनील माने , सत्यजित पाटणकर या चार नावांची जोरदार चर्चा आहे. येत्या दोन ते तीन दिवसात सातारा लोकसभा मतदारसंघाचा महाविकास आघाडीचा उमेदवार घोषित करण्यात येईल असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले आहे.
https://www.facebook.com/share/v/5wxSMZM14upXxxm9/?mibextid=xfxF2i