मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आपल्या आमदारकीचा देखील राजीनामा दिला आणि आता ते भाजपचे नेते आहेत. या राजकीय भूकंपानंतर काँग्रेसमध्ये हालचालींना प्रचंड वेग आला आहे. येत्या राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या बैठका सुरू आहे. आज विधिमंडळामध्ये तातडीची बैठक बोलवण्यात आली होती. तसेच ही बैठक काँग्रेस एकसंघ आहे हे दाखवण्यासाठी देखील होती. परंतु आजच्या या बैठकीला फक्त 36 आमदार उपस्थित होते.
अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर आता काँग्रेसने माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेचा उमेदवार घोषित केले आहे. त्यानंतरची ही विधिमंडळाची बैठक महत्त्वाची होती. या बैठकीतून सात आमदारांनी दांडी मारली आहे. यामध्ये जितेश अंतापुरकर, माधवराव जवळगावकर, असलम शेख, झिशान सिद्दिकी, मोहन हंबर्डे, अमित देशमुख हे गैरहजर होते.
दरम्यान हजेरीबाबत काही जणांनी कारण कळवला आहे. परंतु अशोक चव्हाण यांचे समर्थक असलेले तीन आमदार यांनी मात्र कोणतेही गैरहजेरीचे कारण न करता या महत्त्वाच्या बैठकीला दांडी मारल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.
MARATHA RESERVATION : … अन्यथा पुन्हा मुंबईत येणार ! जरांगे पाटील यांची प्रकृती खालावतेय, पण मागणीवर ठाम !