सिंधुदुर्ग : कोकणातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच ढवळून निघाल आहे. शुक्रवारी चिपळूणमध्ये राणे आणि ठाकरे समर्थकांमध्ये तुफान राडा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार भास्कर जाधव यांच्या संपर्क कार्यालया बाहेरच राणे आणि ठाकरे समर्थक यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली आहे. तर मी सद्य परिस्थिती पाहता ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या सुरक्षित वाढ करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग मध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कडे कोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली आहे. दरम्यान काल निलेश राणे यांच्या ताफ्यावर चिपळूणमध्ये दगडफेक करण्यात आली होती. भास्कर जाधव यांच्या संपर्क कार्यालयाबाहेरच प्रचंड राडा झाला. राणेंची गुहागरमध्ये सभा होती. या सभेपूर्वीच हा संपूर्ण प्रकार घडला आहे.
दरम्यान ‘शिवसैनिक जिल्ह्यातील दहशत मोडण्यासाठी समर्थ आहेत. राणे ज्या पद्धतीने उत्तर देतील त्याच पद्धतीने उत्तर देऊ’! अशी प्रतिक्रिया आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे. त्याचबरोबर नारायण राणेंना जसं उद्धव ठाकरेंवर टीका करण्यासाठी भाजपने ठेवल आहे, तसंच भास्कर जाधव यांवर टीका करण्यासाठी निलेश राणेंना भाजपने ठेवल आहे. भाजपने सोडलेलं हे एक पिल्लू आहे. अशा शब्दात वैभव नाईक यांनी निलेश राणेंवर टीका केली आहे.