मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारवर तोफ डागली होती यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील चोख प्रतिउत्तर दिला आहे ते म्हणाले की त्यांना मराठा समाजाबद्दल किती संवेदना आहेत हे मराठा समाजाला देखील माहित आहे.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यावेळी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ” मराठी बाण्यावर बोलणाऱ्यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. कारण त्यांना मराठा समाजाबद्दल किती संवेदना आहेत हे मराठा समाजाला देखील माहित आहे. आणि आम्हालाही माहित आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्या काळात मराठा समाजाला आरक्षण दिलं. हाय कोर्टात ते चॅलेंज झालं. पण ते टिकवण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि आम्ही केलं. सुप्रीम कोर्टात ते प्रकरण गेल्यानंतर त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होतं ? उपसमितीचे अध्यक्ष कोण होतं ? त्यांनी हे आरक्षण टिकवलं नाही. खरंतर मराठा समाजाच्या आरक्षणाचे मारेकरी खऱ्या अर्थाने तुम्ही आहात. ” असा घनाघाती टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
सांगलीच्या जागेसाठी माझा हट्ट; महाविकास आघाडीच्या वरिष्ठांनी तातडीने निर्णय घ्यावा ! विश्वजीत कदम यांना संजय राऊतांनी दिला ‘हा’ सल्ला; नेमकं काय म्हणाले, वाचा सविस्तर
तसेच ” तुम्हाला मराठा समाजाच्या आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसून तुम्ही मराठा समाजाच्या महिलांच्या मूकमोर्चाला मुका मोर्चा म्हणून हिणवणारे, माता भगिनींचा अपमान करणारे कोण होतं ? हे देखील सकल मराठा समाजाला माहित आहे. “अशी टीका देखील यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.