राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी युवकांच्या अनेक प्रमुख प्रश्नांसाठी युवा संघर्ष यात्रेचे आयोजन केलं होतं. ही यात्रा पुण्यातून सुरू होऊन नागपूरपर्यंत 800 किलोमीटरचा प्रवास करणार होती. परंतु ही युवा संघर्ष यात्रा स्थगित करत असल्याची घोषणा रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे.
या पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवार म्हणाले की, राज्यातील बहुतेक गावात प्रतिनिधींना बंदी आहे. म्हणून संघर्ष यात्रा थांबवत नाही तर राज्यात युवकांच्या आत्महत्या होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र अस्वस्थ होत आहे. या कारणामुळे संघर्ष यात्रा थांबवत आहे असे स्पष्टीकरण आमदार रोहित पवार यांनी दिले आहे.
तसेच आम्ही 15 किलोमीटरचा प्रवास सुरू झाल्यानंतर मनोज जरांगे यांचं दुसरं आंदोलन सुरू झालं. जरांगे यांनी अनेक आंदोलने प्रामाणिकपणे केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांना शब्द देत 30 दिवसात आरक्षण देऊ असं सांगितलं, पण जरांगे यांनी 40 दिवस दिले होते. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर राज्याचा दौरा केला. समाजाची मत जाणून घेतली सरकारकडून गुन्हे दाखल केलेले मागे घेतले. परंतु आरक्षणाचा ठोस निर्णय घेण्यात आला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळायला हवा होता. असं देखील यावेळी रोहित पवार म्हणाले आहेत.
युवकांसह शेतकरी, महिलांचे प्रश्न, रोजगार असे अनेक मुद्दे घेऊन युवा संघर्ष यात्रेची सुरुवात केली. या सर्व प्रश्नांची उत्तरे घेणार होतो. असं यावेळी रोहित पवार म्हणाले. परंतु आता ही युवा संघर्ष यात्रा स्थगित करण्यात आली आहे.