शिरूर : यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात जास्त गाजली आहे ती बारामती लोकसभा मतदार संघाची निवडणूक, कारण ही निवडणूक जेवढी राजकीय दिसते आहे त्यापेक्षा अधिक कौटुंबिक लढाई बनली आहे.
बारामतीमध्ये यंदा लोकसभेसाठी पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला. मतदान प्रक्रिया पार पडली आहे. येत्या चार जूनला नेमकी खासदारकी कुणाला मिळते हे स्पष्ट होईलच. पण तत्पूर्वी पवार कुटुंबीय एकमेकांवर आता बॉलीवूड स्टाईलमध्ये सवाल-जबाब करत आहेत.
तर झालं असं की, सात मे रोजी बारामती मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली आहे. यावेळी अजित पवार हे आपल्या आईसोबत मतदान करण्यासाठी पोहोचले. यावेळी त्यांनी दिवार चित्रपटातला अमिताभ बच्चन यांचा डायलॉग वापरला. मेरी मा मेरे साथ है ! असं त्यावेळी ते म्हणाले, तर आज सुप्रिया सुळे यांनी देखील बॉलीवूड स्टाईलमध्ये अजित पवारांना उत्तर दिले. त्या म्हणाल्या की, ” प्यार से मांगा होता तो सबकुछ दे देते…!”
नाशिकमध्ये उमेदवारी जाहीर होऊन देखील उपयोग नाही? ज्यांच्यासाठी प्रचार सभा त्या हेमंत गोडसेंचाच फोटो बॅनरवर नाही? छगन भुजबळही बॅनरवरून गायब…
तर घडलं असं की, एका सभेमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की ” मी पवारांच्या पोटी जन्माला आलो असतो तर..” अजित पवारांच्या या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना खोचक शब्दात कान उघडणी केली आहे. शिरूरमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी त्या उपस्थित होत्या. यावेळी सभेमध्ये बोलताना त्या म्हणाल्या की, ” आपला पक्ष फुटला, चोरला, वगैरे वगैरे सुरू आहे. पण मी आज तेच म्हणते, प्यार से मांगा होताना सबकुछ दे देते ! नाती तोडायला ताकद लागत नाही. नाती जोडायला ताकद लागते. मंत्रिपद महत्त्वाचं की निष्ठा महत्त्वाची हे तुम्हीच सांगा ? ” असा टोला सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना लगावलाय.