नवी दिल्ली : आज ठाकरे गटासाठी महत्त्वाचा दिवस आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणांमध्ये राहून नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात Supreme Court धाव घेतली. नार्वेकरांनी दिलेल्या निकाला विरोधात ठाकरे गटाने आव्हान दिल असून या याचीके वर आज सात मार्च रोजी सुनावणी होणार आहे. देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्यातील त्री-सदस्य खंडपीठापुढे आज सुनावणी होते आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला प्रमुख शिवसेना पक्ष म्हणून मान्यता दिली. त्याचबरोबर शिंदे यांच्याबरोबर गटात सहभागी झालेल्या आमदारांना देखील पात्र करार दिले होते. दरम्यान राहुल नार्वेकरांच्या याच निकाला विरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत आव्हान दिले आहे. ठाकरे गटाच्या याचिकेवर आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंचा आणि त्यांच्यासोबत गेलेले सर्व आमदार पात्र असल्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. एक मार्च रोजी ही याचिका सरन्यायाधीश चंद्रचूर यांच्यासमोर सादर करण्यात आली होती. जेष्ठ विधिज्ञ कपिल सिबल यांनी या प्रकरणावर लवकरात लवकर सुनावणी घेण्यात यावी अशी विनंती न्यायालयास केली होती. ही विनंती मान्य करून या प्रकरणावर आज सुनावणी होते आहे.