नवी दिल्ली : उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने Supreme Court एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी घेतली जाईल असे सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना 1 एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरविण्यास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नकार दिल्याने उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी आता ८ एप्रिलला सुनावणी होणार असून न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवर १ एप्रिल किंवा त्यापूर्वी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
सरन्यायाधीश चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यालयाकडून ठाकरे गटाच्या याचिकेशी संबंधित मूळ कागदपत्रे मागवली आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
शिंदे गटाला खरी शिवसेना घोषित करण्याच्या सभापती राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने २२ जानेवारी रोजी मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या गटाच्या इतर खासदारांना नोटीस बजावली होती. शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरविण्याची ठाकरे गटाची याचिका सभापतींनी १० जानेवारी रोजी दिलेल्या निकालात फेटाळून लावत शिंदे गटाला खरी शिवसेना म्हटले होते.
Lok Sabha Elections 2024 : महायुतीचे उमेदवार ठरण्यास विलंब का होतोय ? नेमका पेच कुठे ? वाचा सविस्तर