मुंबई : एकनाथ शिंदे गटाच्या अपात्रतेबाबत निकाल देण्यासाठी उद्धव ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. सत्ता संघर्षाबाबत विधानसभा अध्यक्ष निर्णय घेत नसल्याने सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही जे मत व्यक्त केले त्यानुसार योग्य निर्णय घेण्याची अपेक्षा सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली आहे.
याबाबत ज्येष्ठविधीज्ञ एडवोकेट उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय देण्याचा अधिकार हा पूर्णतः विधानसभा अध्यक्षांचा आहे. विधिमंडळाचा आदर ठेवून सुप्रीम कोर्टाने हा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला असून अध्यक्षांनी दोन आठवड्याच्या आत केलेल्या कारवाईचा लेखाजोखा आणि यापुढे किती वेळ लागणार आहे. या संदर्भात अहवाल विधानसभा अध्यक्षांकडून मागवण्यात आला आहे असं यावेळी उज्वल निकम यांनी सांगितले आहे.