नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी सुरूच आहेत. दरम्यान आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नवनियुक्त जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत वाढ होताना दिसून येते आहे.

नेमकं प्रकरण काय
नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी सुधाकर बडगुजर यांचा दहशतवादी सलीम कुत्ता सोबतचा एक फोटो आणि मे हु डॉन या गाण्यावर नाचतानाचा व्हिडिओ भर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सादर केला होता. यानंतर एकच खळबळ उडाली होती. यावर आता नाशिक पोलिसांनी कारवाई करून सुधाकर बडगुजर यांच्यावर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक कृत्यांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितेश राणे यांनी हा फोटो विधिमंडळामध्ये सादर केल्यानंतर नाशिक पोलीस आणि क्राईम ब्रांच बारकाईने यांनी कसून चौकशी केली. यानंतर दहशतवादी असलेला सलीम कुत्ता यांच्यासोबत पार्टी करणे, त्याला भेटवस्तू देणे ही प्रकरण समोर आले. दरम्यान आता हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधिक कसून तपास करणार आहे.

- मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी सलीम कुत्ता हा पॅरोलवर नाशिकच्या कारागृहातून सुटला होता.
- सुधाकर बडगुजर यांच्या एका जवळच्या नातेवाईकाच्या फार्म हाऊसवर सलीम कुत्तासाठी ही पार्टी आयोजित करण्यात आली होती.
- 24 मे 2016 रोजी ही पार्टी आयोजित करण्यात आली होती.
- या पार्टीमध्ये इतर पक्षाचे लोक देखील होते. असा आरोप बडगुजर यांनी केला असून त्यांच्यावर कारवाई का केली नाही असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
- नितेश राणे यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात बडगुजर आणि सलीम कुत्ता यांचा मे हु डॉन या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ समोर आणला.

- शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सरकारवर टीका केली होती. भाजपा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर देखील देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. कारण सुधाकर बडगुजर हे संजय राऊत यांच्या खास मर्जीतील आहेत.
- ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने होत असल्याचा सुधाकर बडगुजर यांनी म्हटल आहे.
दरम्यान ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का समजला जातो आहे