भिवंडी : भिवंडीतून एक मोठी बातमी समोर येते आहे. भिवंडीचे विद्यमान आमदार रईस शेख यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. शेकडो महिला आणि कार्यकर्त्या सध्या यांच्या कार्यालयाबाहेर जमले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतर्गत राजकीय वादानंतर आमदार राईस शेख यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय हालचालींना वेग आला असताना रईस शेख यांच्या आमदारकीच्या राजीनामांनी भिवंडीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आमदारांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळताच समाजवादी पक्षाचे शेकडो कार्यकर्ते रईस शेख यांच्या कार्यालया बाहेर जमले आहेत.
Baramati : राजकारणात काहीही होऊ शकतं ! ” अजित पवारांना आधी विंचू म्हंटले होते, आता ते कार्यसम्राट नेतृत्व आहेत…! ” विजय शिवतारेंकडून अजित पवारांचे तोंड भरून कौतुक
भिवंडीतील आमदार रईस शेख यांचे मोठे कार्य आहे. पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे त्यांना अचानक राजीनामा द्यावा लागला आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या देखील कार्यालया बाहेर जमून त्यांना राजीनामा देऊ देणार नाही आणि जर पक्षाने त्यांचा राजीनामा मंजूर केला तर भिवंडी शहरात रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा या कार्यकर्त्यांनी दिला आहे.