मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी अखेर भोकर विधानसभा मतदार संघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं घोषित केल आहे. अशोक चव्हाण यांच्या या निर्णयानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर खरमरीत टीका केली आहे.
संजय राऊत यांनी आपल्या एक्स अकाउंट वरून अशोक चव्हाण यांच्या राजीनामा पत्राचा फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ” अशोक चव्हाण भाजपवासी झाले. विश्वास बसत नाही. कालपर्यंत ते सोबत होते. चर्चा करत होते. आज गेले.एकनाथ मिंधे आणि अजित पवार यांच्याप्रमाणे चव्हाण सुद्धा आता काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय ? आणि निवडणूक आयोग त्यांना ते देणार काय ? आपल्या देशात काहीही घडू शकतं… अशा शब्दात संजय राऊत यांनी अशोक चव्हाण यांवर टीका केली आहे.
अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चेला उधान येत असताना. ‘काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते हे भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत. आगे आगे देखिये होता है क्या ? ‘ असे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या भाजप पक्षप्रवेशावर शिक्का मोर्तब केव्हा होतो आहे , याकडेच आता महाराष्ट्राचं लक्ष लागला आहे.