मुंबई : बारामती ॲग्रो घोटाळ्याप्रकरणी आज दुसऱ्यांदा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची ईडी चौकशी होणार आहे. यापूर्वी 24 जानेवारीला देखील रोहित पवार यांची चौकशी करण्यात आली होती. यावेळी तब्बल 11 तास ही चौकशी करण्यात आली होती. दरम्यान आज स्वतः नातवासाठी प्रतिभा पवार या पक्ष कार्यालयात उपस्थित राहणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटाचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या मागे बारामती ॲग्रो घोटाळ्या प्रकरणी चौकशी लागली आहे. 24 जानेवारीला तब्बल 11 तास ही चौकशी करण्यात आली होती. यावेळी स्वतः शरद पवार आणि खासदार सुप्रियाताई सुळे या आल्या संकटामध्ये रोहित पवारांच्या खांद्याला खांदा लावून उभे होते. तर आज स्वतः रोहित पवार यांच्या आजी पक्ष कार्यालयात दिवसभर उपस्थित राहणार आहेत.
बारामतीत समर्थक आक्रमक
24 जानेवारीला देखील रोहित पवार यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते आक्रमक झाले होते. बारामती तहसीलदार कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केल आहे. तर तहसीलदारांना निवेदन देखील देण्यात आल असून या कारवाईचा निषेध व्यक्त केला जातो आहे. तर यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे.