मुंबई : राज्यसभेच्या Rajya Sabha Election 2024 महाराष्ट्राच्या ६ जागांसाठी निवडणुकीची तारीख जाहीर होताच सर्वच पक्षांनी आता कंबर कसली आहे. सध्या तीनही पक्ष आपापल्या उमेदवारांची चाचपणी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपकडून राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर या नावांची चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा तर अजित पवार गटाकडून अल्पसंख्यांक समाजातील उमेदवारा संधी मिळण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे.
कशी आहे निवडणूक प्रक्रिया
- राज्यसभा निवडणुकीसाठी विधानसभेतील 287 आमदार करणार मतदान
- निवडून येण्यासाठी ४२ मतांच तुल्यबळ आवश्यक
- 27 फेब्रुवारी रोजी राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी निवडणुकीची रणधुमाळी पार पडणार आहे. निवडणुकीचा वेळापत्रक नुकतंच निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक आयोगाने वेळापत्रक नुकतंच जाहीर केलं असून 27 फेब्रुवारीला निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. तर 29 फेब्रुवारीला निकाल घोषित केला जाणार आहे.
राज्यसभेतील सतरा राज्यातील 56 सदस्यांचा कार्यकाळ येत्या एप्रिल 2024 मध्ये पूर्ण होतो आहे. दरम्यान या 56 पैकी 6 सदस्य यांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2024 ला संपणार आहे त्यानुसार महाराष्ट्रातील या प्रमुख नेत्यांचे भवितव्य आता गुलदस्त्यात असणार आहे.
महाराष्ट्रातील या सहा खासदारांचा कार्यकाळ संपणार
- भाजपचे खासदार प्रकाश जावडेकर
- केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे
- खासदार कुमार केतकर
- खासदार अनिल देसाई
- खासदार श्री. व्ही. मुरलीधरन
- राष्ट्रवादी खासदार वंदना चव्हाण
कोणाकडे आहेत किती आमदार ?
- भाजप 104 आमदार
- राष्ट्रवादी अजित पवार गट 42 आमदार
- शिवसेना शिंदे गट 40 आमदार
- काँग्रेस 45 आमदार
- शिवसेना उद्धव ठाकरे गट 16 आमदार
- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 11 आमदार
- बहुजन विकास आघाडी 3 आमदार
- समाजवादी पक्ष 2 आमदार
- एमआयएम 2 आमदार
- प्रहार जनशक्ती 2 आमदार
- महाराष्ट्र नवनिर्माण सेना 1 आमदार
- सीपीआयएम CPIM, शेकाप, स्वाभिमानी पक्ष, रासप, जनसुराज्य शक्ती, क्रांतिकारी शेतकरी पक्ष प्रत्येकी 1 आमदार
- आणि अपक्ष 13 आमदार
दरम्यान महायुतीचे तीनही पक्ष आता आपल्या उमेदवाराची चाचणी करत आहेत या जागा निवडून आणण्यासाठी महायुतीने निर्धार केला आहे