रत्नागिरी : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील निवासस्थानी एसीबीने ACB छापा टाकला आहे. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्तीचे मालक असल्याच्या कारणामुळे एसीबीने ही कारवाई केली आहे. एसीबीने गुन्हा दाखल केला असून यामध्ये राजन गवळी यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि त्यांचा मुलगा यांचे देखील नाव आहे.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीचे आमदार राजन गवळी यांनी आपल्या उत्पन्नापेक्षा थोडी थोडकी नाही तर तब्बल 118 टक्क्यांनी अधिक संपत्ती जमवली असल्याचा ठपका एसीबीने ठेवला आहे. त्यानुसार रत्नागिरी एसीबीने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून राजन साळवी यांनी ३ कोटी 53 लाखांची संपत्ती जमा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. राजन साळवी यांची मूळ संपत्ती दोन कोटी 92 लाख एवढी असून मागच्या 14 वर्षात त्यांनी ही संपत्ती जमा केल्याचा आरोप एसीबीने केला आहे.
दरम्यान या प्रकरणी एसीबीने गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील निवासस्थानी छापा टाकला आहे. यावर राजन साळवी यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ” मी लेचापेचा शिवसैनिक नाही, परिणामांची पर्वा करत नाही. माझ्या पत्नी आणि मुलावर गुन्हा दाखल झाला, हे दुर्दैव आहे. शिंदे गटात न गेल्याने परिणाम भोगावे लागणार ! असे देखील यावेळी राजन साळवी यांनी म्हटलं आहे.