नवी दिल्ली : आज मनसे प्रमुख राज ठाकरे Raj Thackeray आणि त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे Amit Thackeray यांनी दिल्लीमध्ये जाऊन भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा Amit Shah यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राज ठाकरे आता महायुतीमध्ये सामील होणार का ? अशा चर्चेला जोरदार उधान आले आहे.
खरंतर थेट दिल्लीमध्ये जाऊन राज ठाकरे यांनी अमित शहा यांची घेतलेली. ही भेट मनसे महायुतीमध्ये सामील होणार असे स्पष्ट संकेतच देत आहेत. त्यात स्वतः राज ठाकरे यांनी देखील अमित शहा यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून लिहिले आहे की, आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दिल्लीत भेट झाली असं कॅप्शन मध्ये लिहिल आहे.
त्याचबरोबर राज ठाकरे यांच्यासोबत आज युवा नेते अमित ठाकरे हे देखील उपस्थित होते. त्यांनी देखील आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून या भेटीचे फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ” महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब यांची भेट घेतली. मलाही या ग्रेट भेटीचा साक्षीदार होता आलं! ” असं अमित ठाकरे यांनी लिहिल आहे.

एकंदरीतच ही भेट नेमकी कशासाठी होती हे अद्यापही स्पष्ट झालं नसलं तरी अर्थातच राज ठाकरे आता महायुतीत सामील होणार असे स्पष्ट संकेत आहेत.