मुंबई : महाराष्ट्र आणि खरंतर संपूर्ण देश ज्या निकालाची प्रतीक्षा करत होता,त्या निकालाचे वाचन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुरु केले आहे. वाचनाच्या सुरवातीलाच शिवसेना नेमकी कुणाची या महत्वाच्या मुद्यावर निकाल जाहीर करताना राहुल नार्वेकरांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार निवडणूक आयोगाकडे विधिमंडळ सचिवालयाने शिवसेना पक्षची घटना मागितली होती. निवडणुक आयोगाने घटनेची एक प्रत दिली पण त्यावर तारीख नव्हती. त्यामुळे 2018 ची घटना स्वीकारता येणार नाही. 2018 साली पक्षाच्या घटनेत केलेले बदल ग्राह्य धरले जाणार नाहीत. 2018 ची घटना ग्राह्य धरण्याचा उद्धव ठाकरे गटाचा दावा अमान्य असल्याचे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.
विधानसभाअध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निरीक्षणात प्रमुख मुद्दे
- एकनाथ शिंदेंची हकालपट्टी मान्य करता येत नाही
- 2018 ला शिवसेना पक्षाचे नेतृत्व मान्य करता येणार नाही. पक्षात उद्धव ठाकरे एकटे निर्णय घेऊ शकत नाहीत.
- पक्षातील कोणत्याही सदस्याला काढून टाकण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंकडे नाही. पक्षप्रमुख नाही तर राष्ट्रीय कार्यकारणीचा निर्णय अंतिम !
- शिंदेंचा गट हीच खरी शिवसेना !
- भरत गोगावले ह्यांना प्रतोद म्हणून मान्यता
- शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरत नाहीत, बैठकीला गैरहजर राहणं हे पक्षातून हकालपट्टीचं कारण होऊ शकत नाही.
- ठाकरे गटाचे आमदारही पात्र