पुणे : यंदाची लोकसभा निवडणूक ही प्रचंड गाजली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात या निवडणुकीचा नक्कीच दाखला दिला जाईल. पुण्याची लोकसभा निवडणूक Lok Sabha Election ही देखील तेवढीच टस्सल झाली आहे. खरी लढत होती ती म्हणजे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ Murlidhar Mohol यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर Ravindra Dhangekar आणि या दोघांमध्ये देखील आणखीन एक नाव होते ते म्हणजे वसंत मोरे Vasant More यांचे…
वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली. पक्षातील अंतर्गत वाद विवादांना कंटाळून त्यांनी 18 वर्षानंतर मनसेला जय महाराष्ट्र करून लोकसभेला उभे राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावेळी त्यांनी अगदी मुंबईमध्ये जाऊन संजय राऊत, शरद पवार या बड्या नेत्यांची देखील भेट घेतली. तर पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर यांची देखील भेट घेतली होती. परंतु महाविकास आघाडीच्या वतीने रवींद्र धंगेकर यांना जवळपास तिकीट निश्चित होते. त्यामुळे वसंत मोरे यांच्यासमोर अपक्ष उभे राहण्याचा पर्याय होता. दरम्यान वसंत मोरे यांनी जरांगे पाटील आणि त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ही निवडणूक लढवावी यास मान्यता दिली.
लोकसभा निवडणूक 2024 मध्ये वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवडणूक लढवली. परंतु या निवडणुकीमध्ये त्यांना केवळ 32 हजार १२ मतच मिळू शकली आहेत. त्यामुळे नियमानुसार वैध मतांच्या एक शष्टमांश मते मिळाली नाहीत तर अनामत रक्कम जप्त केली जाते. या निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आता वसंत मोरे यांचे डिपॉझिट जप्त करण्यात आले आहे.